देवरी दसरा उत्सव समिती साजरा करणार दसरा उत्सव

◾️दुरूनच बघावे लागणार दसरा उत्सव , कोरोनाचे भान ठेवून साजरा होणार उत्सव

प्रा. डॉ. सुजित टेटे

देवरी 15: दसरा उत्सव समिती द्वारा अतिशय साध्या पद्धतीने दसरा उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून कोरोनाचे नियम पाळून , सामाजिक अंतर बाळगून देवरी येथील क्रीडांगणावर सायंकाळी 7:30 वाजता दसरा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीने दिली आहे.

सदर दसरा उत्सव समिती दरवर्षी हा सण साजरा करीत असून यामध्ये खालील सदस्यांचा मोलाचा सहकार्य असतो.

१) आफ़ताब शेख़
२) पारस कटकवार
३) शेंकी भाटिया
४) हमीद मेमन
५)अर्पित जैन
६) रतनेश असाटि
७) काक्के भाटिया
८) अंशुल अग्रवाल
९) गोपाल तिवारी
१०) शूरेश साहु
११) राजेश साहु
१२) युवराज मेश्राम
१३) प्रवीण दहिकर
१४) विजय गहाने
१५) सचिन बावरिया
१६) रितेश अग्रवाल
१७) भूषण मस्करे
१८) अमित गुप्ता
१९) अनिल येरणे
२०) पुष्पकुमार गांगबोईर
२१) आशीष अंबिलकर
२२) यादव पंचमवार
२३) विनोद गभने

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट मांडून पुजा केली जाते यास घटस्थापना असे म्हणतात. घट 9 दिवसाचे असून यास नवरात्र असे म्हणतात. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

Print Friendly, PDF & Email
Share