लाखनी येथे वीज बिलांची होळीतालुकाध्यक्ष धनंजयजी घाटबांधे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले..

तुषार हर्षे

लाखनी २३: भारतीय जनता पार्टी लाखनी तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष धनंजयजी घटबांधे यांच्या नेतृत्वात लाखनी तहसीलदार निवेदन देऊन बिलांची होळी करण्यात आली. यावर्षी कोवीड-१९ च्या महामारी मुळे राज्यात मागील ८ महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे सदर लाकडावूनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे सरकार कडून आदेश देण्यात आले होते. मागील तीन महिन्यांचा काळ लोटला असून शेतकरी व हात रोजी ने काम करणारे कित्येक नागरिक यांना लॉकडाऊन च्या काळामध्ये घरातून बाहेर जाता आले नाही. कोणतेही रोजगार उपलब्ध झालेले नाही. त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता . अश्या संकटाच्या काळात वाडीव वीज बिल वीज वितरण महामंडळाने प्रचंड प्रमाणात वीज बिल सर्व नागरिकांना दिले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये विज बिल संदर्भाने मोठा जन आक्रोश निर्माण झालेला आहे. विज बिल दरवाढ करून अडचणीत आणल्यामुळे नागरिक बिल भरू शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की, लॉकडाऊन च्या काळामधील बिल हे जुन्याच युनिट प्रमाणे बिल द्यावा आणि प्रतिमहा बिलाची आकारणी करावी वन आकार ची दरवाढ सुद्धा कमी करावी. युनिट प्रमाणे देयकरात आकारणी करीत असताना बहुतांश बिलामध्ये वाढीव दराने आकारणी करण्यात आली आहे. अशा सर्व बिलाची पूर्ण चौकशी करून बिलात सुधारणा करावी तसेच लॉकडाऊन च्या काळातील मार्च महिन्यापासून ते नोव्हेंबर २०२० पर्यंतचे विद्युत बिल माफ करावे. हीच आमची मागणी आहे.आमच्या मागण्यावर तात्काळ अंमलबजावणी करून सामान्य जनतेला यातून दिलासा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी लाखनी तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share