नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटन शुल्कात 1 नोव्हेंबरपासून वाढ

भंडारा 11: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 1 ऑक्टोंबर 2021 पासून वाहन क्षमतेच्या मर्यादेत पर्यटनाकरीता ऑनलाईनद्वारे व सफारीचा कोटा शिल्लक असल्यास ऑफलाईनद्वारे सुरु करण्यात आलेले आहे. राज्याचे वने, अर्थ व नियोजन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली 5 जून 2020 रोजी मुंबई येथे पार पडलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान मंडळाच्या बैठकीत नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्राकरीता पर्यटन शुल्क व कॅमेरा शुल्कात पुढीलप्रमाणे दरवाढ मंजूर करण्यात आलेली आहे.

नागझिरा वन्यजीव अभयारण्य व न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव वन्यजीव अभयारण्य येथे सफारीसाठी प्रवेश शुल्क

भारतीय नागरिकांसाठी- प्रौढ व्यक्ती (प्रति व्यक्ती) 125 रुपये प्रति फेरी, विद्यार्थी (5 वर्षावरील प्रति विद्यार्थी) 60 रुपये प्रति फेरी.

भारतीय नागरिक वगळता- प्रौढ व्यक्ती (प्रति व्यक्ती) 250 रुपये प्रति फेरी, विद्यार्थी (5 वर्षावरील प्रति विद्यार्थी) 125 रुपये प्रति फेरी.

वाहन शुल्क- हलके वाहन (प्रति व्यक्ती) 350 रुपये प्रति फेरी, जड वाहन (प्रति व्यक्ती) 500 रुपये प्रति फेरी.

कॅमेरा शुल्क भारतीय नागरिकांसाठी- स्थिर कॅमेरा (प्रति कॅमेरा) 250 रुपये प्रति फेरी, चल कॅमेरा (प्रति कॅमेरा) 500 रुपये प्रति फेरी. भारतीय नागरिक वगळता- स्थिर कॅमेरा (प्रति कॅमेरा) 900 रुपये प्रति फेरी, चल कॅमेरा (प्रति कॅमेरा) 1100 रुपये प्रति फेरी असे सुधारित शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

सुधारित शुल्क 1 नोव्हेंबर 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर 2021 नंतर पर्यटकांचे आरक्षण तिकीटावर जूने दराने आरक्षण असल्यास त्यांना येणारी फरकाची रक्कम पर्यटन प्रवेशद्वारावर भरावी लागेल. तरी पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एम.रामानुजम यांनी कळविले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share