धोक्याची घंटा…राज्यातील ‘या’ जिल्ह्यात शाळा बंद

परभणी : राज्यभरात नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असतांना एका विद्यार्थ्याला कोरोना झाल्याने तीन आठवड्यांसाठी शाळा बंद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गौर गावातील एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक अशा 69 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये आठवीचा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तीन आठवड्यासाठी ही शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले विद्यार्थी आणि नातेवाईकांच्याही चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या त्यांना निरक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरेही सुरु करण्यात आली आहेत. दिवाळीनंतर महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सणात कोरोनाचा पुन्हा धोका वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share