चाचेर व निमखेडा येथे शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

सत्येम गुरव/ प्रतिनिधी

निमखेड़ा 23: तालुक्यातील चाचेर व निमखेडा येथे शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार मा.श्री.आशिषबाबू जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले… स्व.अशोककुमार गुजर कल्पना भात गिरणी मर्या.महादूला या संस्थेच्या वतीने हे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावात शेतकर्‍यांची धान विक्री व्हावी यासाठी नागपूर जिल्हयात पुरेशी धान खरेदी केंद्रं सुरु करण्यात येत आहेत जेणेकरून शेतकर्‍यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होणार नाही. मागील वर्षीप्रमाणे यंदाही शेतकर्‍यांना 700 रुपये बोनस मिळणार आहे….
कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रथम शेतकऱयांचे धान मोजणी केली त्या शेतकऱयांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले…

यावेळी आमदार श्री आशिषबाबू जयस्वाल,शिवसेना नागपूर जिल्हा उपप्रमुख देवेंद्रजी गोडबोले, कल्पना भात गिरणी चे अध्यक्ष संजयजी ढोबळे,शिवसेना तालुकाप्रमुख सधुकरजी हटवार,प.स.सदस्य ध्यानेश्वर चौरे,सरपंच भुमेश्वरजी चाफले,महेशजी कलारे,नामदेव देशमुख,संचालक संपतराव गायधने,प्रमोद बरबटे,झमतांनी बंधू,रतन मेघरे,दिनकर आंबीलडुके,गुलाब चाफले,जितु साठवणे,बंडू घरजाळे,विकास झाडे,दशरथ महादूले,श्रीनिवास,सिंनू,व्यंकट बाबू,पटीयेजी व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share