महागाईचा झटका! व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात वाढ

नवी दिल्ली: ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशीच नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात ४३ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे मुंबईत १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दर १६८५ रुपयांवर पोहोचला आहे.

१ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात ७५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पुन्हा सिलिंडर दरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलिंडर दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि ढाब्यावरील जेवण महागण्याची शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email
Share