नेफडो ची वृक्षारोपण करून श्रद्धांजली

देवरी 30: प्रा.बहेकार , नागपूर विभाग अध्यक्ष, नेफडो यांचे दिनांक 15/9/21 ला अपघाती निधन झाले.राष्ट्रीय सल्लागार तसेच महाराष्ट्र पर्यटन व कला महोत्सव समितीचे अध्यक्ष शेख जाकीर हुसेन जी यांचे दिनांक 25/9/21 ला हृदय विकाराने निधन झाले.

यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास शाखेच्यावतीने वृक्षारोपण 29 सप्टेंबर 2021 ला अंगणवाडी भागी देवरी येथे वृक्षारोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्या प्रसंगी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास तालुका देवरी चे अध्यक्ष सचिन भांडारकर, उपाध्यक्ष सोमणगिरी चव्हाण, सचिव इंजिनीयर प्रीती नेताम, कोषाध्यक्ष इंजिनीयर विकी चौधरी,प्रसिद्धी प्रमुख समीर साखरे,साक्षी जवेरी, पूजा यावलकर, खुशबू दसरिया, रक्षा रामटेके, प्रीती जांभुळकर आदी सदस्य उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास भागी येथील अंगणवाडी सेविका नंदिनी बारसागडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुहाग गिरी, टीकम वैष्णव, साहिल चव्हाण, पिंटू चव्हाण आदी शिवसैनिकांचे सहकार्य लाभले.

Print Friendly, PDF & Email
Share