चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय वैद्यकीय मंडळ कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात

चंद्रपूर : वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सर्व कागदपत्रे व वैद्यकीय फॉर्म भरून सही घेवून अहवाल देण्याच्या कामाकरिता ५० हजारांच्या लाचेची मागणी करून स्विकारतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथील वैद्यकीय मंडळ कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक शेख सलीम शेख मौलाना यांना लाप्रवि पथकाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रादरार हे सिंदेवाही येथील असून ते शिक्षण घेत आहेत. तक्रारदार यांचे वडील हे पोस्ट खात्यामध्ये नोकरीला होते. त्यांना अर्धांगवायुचा त्रास असल्याने ते वैद्यकीयदृष्टया नोकरी करण्यास अपात्र ठरल्याने त्यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये वरीष्ठ पोस्ट मास्तर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती स्विकारली. त्यानंतर मिळल असलेल्या पेंशनपैकी ४० टक्के पेंशन शासनास विकायची असल्याने त्यांनी प्रवर डाक अधीक्षक, प्रधान डाक कार्यालय चंद्रपुर यांच्याकडे अर्ज केला होता. नमुद कार्यालयाकडून तक्रारदार यांच्या वडीलांना शारीरीक अपंगत्व असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सर्व कागदपत्रे व वैद्यकीय फार्म भरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथील वैद्यकीय मंडळ अध्यक्ष कुमरे यांची सही घेवून अहवाल देण्याच्या कामाकरिता येथील वरीष्ठ सहाय्यक शेख सलीम शेख मौलाना यांनी तक्रारदारास 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदारास लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारावाईचे आयोजन केले. त्यामध्ये २२ सप्टेंबर रोजी पडताडणी दरम्यान वरीष्ठ सहाय्यक शेख सलीम शेख मौलाना यांनी तक्रारदारास वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सर्व कागदपत्रे व वैद्यकीय फॉर्म भरून वैद्यकीय मंडळ अध्यक्ष कुमरे यांची सही घूवन अहवाल देण्याच्या कामाकरिता ५० हजार रूपये लाचेची मागणी करून काल २८ सप्टेंबर रेाजी स्वतः सिव्हील हॉस्पीटल चंद्रपूर जवळ लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना लाप्रवि चंद्रपूर पथकाने रंगहाथ पकडले. त्यावरून वरिष्ठ सहाय्यक शेख सलीम शेख मौलाना विरूध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाप्रवि नागपूरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे, पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे तसेच कार्यालयीन स्टाफ सफौ रमेश दुपारे, पोहवा मनोहर एकोणकर, नापोकॉ संतोष येलपूलवार, अजय बागेसर, पोकॉ रोशन चांदेकर, नरेश नन्नावरे, रवी ढेंगळे, संदेश वाघमारे, मपोशि समिक्षा भोेंगळेच, चापोशि सतीश सिडाम यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •