धक्कादायक – डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

डोंबिवली: डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींमधील २१ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन जण विधी संघर्षित बालक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून, दरम्यान, मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनिरी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांकडून तपास सुरु आहे. तसेच तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडून देखील या घटनेचा तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •