अवैध्यरित्या मटका जुगार खेळणाऱ्या 2 इसमांवर कारवाई

देवरी 21: देवरी पोलिसांनी नुकतीच अवैध्यरित्या जुगार खेळणाऱ्या 2 इसमांवर धडक कारवाई केली असून त्यांच्या कडून 3300/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे देवरी येथे नामे अजयकुमार आत्माराम लटये (27) रा. देवरी वॉर्ड नं 13 देवरी हा वाडा बार आणि देवरी परिसरात अवैध्यरित्या मोबाईल वर मणिपूर कल्याण वरली मटका जुगाराचे आकडे लिहून जुगार खेळात असल्याची माहिती मिळाल्याने रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टाफ सह रेड घातली असता आरोपी जवळ एक जीवोनी कंपनीचा मोबाईल किंमत 3000/- , नगदी 290/- आणि पेन किंमत 10/-. एकूण 3300/- रु तसेच आकडे लिहलेले चिटोरे मिळाले.

आरोपी सदर जुगाराची सट्टापट्टी नामे प्रेम घासले रा चिंचेवाडा यास देत होता. आरोपी 1) अजयकुमार लटये (27) आणि 2) प्रेम घासले यांना फिर्यादी हेमंत मस्के ब नं. 232 यांच्या रिपोर्ट वरून अपराध क्र 230/2021 कलम 12 (अ) मजुका 109 भादंवि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर , उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि रेवचंद सिंगनजुडे , पो ना करंजेकर , मस्के , यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share