गणेश उत्सव मंडळाला मुजोरी भोवली; मिरवणूक काढल्याने गुन्हा दाखल

तिरोडा : येथील मुंडीकोटा नवयुवक गणेश मंडळाच्या कार्यकत्यांवर तिरोडा पोलीस स्टेशन येथे दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी सांयकाळी ‘डोल ताशाच्या ‘ गजरात मिरवणूक काढली असल्याने तिरोडा पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी हजेरी लावून मिरवणूक थांबविली. जमलेल्या गर्दीला पांगविले. अतिशय मोजक्या कार्यकत्यांचे उपस्थित सामान्यपणे श्री गणेश विसर्जन पोलीस बंदोबस्ताचे उपस्थित करण्यात आला.

पोलीस स्टेशन तिरोडा हद्दीत अनेक सार्वजनिक मंडळानी श्रीं ची स्थापना अटी-शर्ती, नियमाला बाध्य राहून उत्सव करण्याचे कबुलीवर मंडळांना परवानगी देण्यात आलेली होती. तरी देखील नियमांचे उल्लंघन करून, कायदा व सुव्यस्थेला बगल देऊन कार्य करणाऱ्या मुंडीकोटा मंडळाचे 7 पदाधिकाऱ्यासह अन्य 2 असे 9 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

नवयुवक गणेश मंडळ मुंडीकोटाने ढोल तासाचे गजर, डी-जे साऊंडच्या मदतीने सालाबादप्रमाणे मिरवणूक काढली. ही मिरवणूक मुंडीकोटा झंडा बाजार चौक येथे आली होती. दरम्यान पोलिसांचा ताफा बघताच मिरवणुकीत सहभागी असलेले सैरावैरा झाले. पोलिसांच्या दोन गाड्या बघून ढोल ताशा बंद झाला. हे बघून गाव पुढारी समोर आला. अखेर त्याला देखील कायद्यासमोर झुकावे लागले.

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय मुबंई यांचे परिपत्रक नुसार कोविड -19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशेत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून श्री चे आगमन व विसर्जन मिरवणू कां काढण्यात येऊ नयेत. असे सप्ष्ट नमुद करण्यात आले. या बाबत सर्व गणपती मंडळ यांना परवानगी देते वेळी आणि गणपती मंडळाच्या बैठकीच्यावेळी सुस्पष्ट माहिती त्यांना देण्यात आलेली होती. सरपंच मुंडीकोटा यांनी देखील ना-हरकत प्रमाणपत्र शासन परिपत्रकनुसार दिले होते.

तरीपण आज दिनांक 19/09/21 रोजी 17/45 वाजता नवयुवक गणेश मंडळ मुंडीकोटा यांनी गणपती विसर्जन मिरवणूकीला बंदी असतांना सुद्धा माँ सरस्वती दिलवरग्रुप डी-जे धमाल यांचे साउंड मोठया गाडीवर लावून गणपतीचे गाणे वाजवीत, मध्ये बँड वाजवून मोहल्ल्यातील पुरुष-महिला, तरुण-बालगोपालसह नाचत, एकमेकांना गुलाल लावीत मिरवणूक काढलेली होती.

मुंडीकोटा नवयुवक गणेश मंडळाने शासन परिपत्रकाचे उलंघन केल्यामुळे गणपती मंडळाचे कार्यकर्ते यांचे विरुद्ध पोशी. इरफान शेख यांचे तक्रारीवरून कलम 188, 269 भादवि सह कलम 51(ब) राष्टीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, सह-कलम 11 महाराष्ट्र कोविड अधिनियम 2020, सहकलम 2, 3 नुसार (1) प्रमोद काळसर्पे अध्यक्ष, (2) सोमेश राऊत उपाध्यक्ष, (3) शीवकुमार राऊत सचिव, (4) बुद्धघोष बोम्बार्डे कोषाध्यक्ष, (5) मंगेश राऊत सदस्य, (6) निकेश नीलगाये सदस्य, (7) अक्षय राऊत सदस्य, (8) माँ सरस्वती दिलवर गुप डी-जे धुमाल पार्टी पांजरा (देवाडा) तुमसर जिल्हा भंडाराचा मालक, (9) टाटा एस 207 डी आय गाडी क्रमांक MH 36/ AA 1324 चा मालक चालक यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील गुन्ह्यांचा तपास पो. हवा. शंकर साठवणे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share