देवरीत पोलिसांचा रूटमार्च

देवरी 18: विघ्नहर्ता गणरायाचा परतीचा प्रवास निर्विघ्न पार पाडण्याच्या उद्देशाने देवरी शहरात आज पोलिसांनी रुट मार्चचे आयोजन केले.

शहरातील सर्व सार्वजिनिक आणि इतर गणरायांचे विसर्जन होणार आहे. दहा दिवस चालणारा हा सण आतापर्यंत शांततामय आणि सोहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. विसर्जनाचे कार्यकर्म सुद्धा शांततेत पार पाडण्यासाठी देवरी पोलिसांनी कंबर कसली आहे. देवरीच्या इतिहासात प्रथमच सर्व सार्वजनिक मंडळांना पोलिसांनी वेळापत्रक पुरविले आहे.

दोन दिवस आधीच सर्व मंडळांची बैठक ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी आयोजित केली होती. या पार्श्वभूमीवर सिंगणजुडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडगे , श्री उरकुडे यांचेसह 40 जवानांच्या मदतीने रुटमार्चचे आयोजन करण्यात होते. उल्लेखनीय म्हणजे देवरी नगरपंचायतीने यावेळी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार केला असून या हौदाचा वापर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सर्व गणेश भक्तांना केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share