दोन हजारा साठी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात

घरकुल ची रक्कम मंजूर करण्यासाठी पंचायत समितीत स्वीकारली रक्कम

जिवती तालुक्यातील घोडा अर्जुनि येथील एका घरकुल लाभार्त्या कडून तिसऱ्या टफ्यातील रक्कम मंजूर करण्यासाठी दोन हजारची लाच घेण्यारया पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल केला आहे. आशीश उत्तमराव शिंदे असे अटकेतील आरोपी चे नाव आहे .घोडा अर्जुनि येथील तक्रारदाराचे वडील व आजोबा च्या नावाने घरकुलासाठी दोन लाख 96 हजार रुपये मंजूर झाले होते . बांधकामाच्या तिसरा टप्पा पूर्ण झाल्याने 90,000 मिळावे यासाठी पंचायत समिती जिवती येथे देयक सादर केले . शिंदे याने हे बांधकाम पूर्ण झाले की नाही याची पाहणी करण्यासाठी घोडा अर्जुनि येथे गेले होते . बिल मंजुरीसाठी दोन हजार रुपये मागितले मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्यांनी एसीबी कडे तक्रार केली . दोन हजार रुपये घेताना पथकाने रंगेहात पकडले .

Print Friendly, PDF & Email
Share