राष्ट्रीय महामार्गावर दरोडा घालणारे 5 आरोपींना 2 तासात अटक करुन 22 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी पोलिस यांची उत्तम कामगिरी

देवरी 15: दिनांक 14/9/ 2021चे दुपारी 12 वाजता फिर्यादी नामे मोहम्मद इरशाद मोहम्मद फारुक कुरेशी वय 28 वर्षे राहणार शिवनी मध्य प्रदेश हा ट्रक क्रमांक MH 42 G 6617 वाहनाने त्याचे दोन मजूर आसह नागपूर येथून बोरी जिल्हा गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरून जात असताना सायंकाळी 16:00 वाजता सुमारास देवरी येथे मिलन ढाब्याजवळ एक पांढर्‍या रंगाची टाटा कंपनीची झेस्टा चार चाकी वाहन क्रमांक CG-07 BK 5180 ही ट्रक च्या जवळ येऊन त्यातील इसमांनी गाडी थांबविण्याचा इशारा केल्याने फिर्यादी यांनी ट्रक थांबवला असता सदर वाहनातील एक इसम हा ट्रकमध्ये चढुन त्याने ट्रक ची चावी काढून फिर्यादी यास खाली उतरविले.

फिर्यादी यांनी सदर इसमास आपण कोण आहात व माझी गाडी का थांबविली असे विचारले असता आम्ही गाडी सीज करनेवाले आहोत असे सांगितले परंतु गाडीचे फायनान्स इंस्टॉलमेंट दिनांक 5-9-2021 ला भरलेले असल्याने फिर्यादी याच्यावर संशय आल्याने ट्रक मालकाच्या मुलाला फोन लावले असता सदर इसमाने फिर्यादीचे मोबाईल हिसकावून मारपीट केले व त्या सोबत असलेल्या साथीदारांनी ट्रक मध्ये असलेले दोन मजूरांकडे असलेले मोबाइल हिसकावून आपल्याजवळ ठेवले त्यानंतर त्यापैकी एका इसमाने ट्रक आपल्या ताब्यात घेऊन छत्तीसगडच्या दिशेने निघाले व फिर्यादीला आरोपीनी त्यांच्याकडील असलेल्या झेस्टा गाडीमध्ये बसवून ट्रक सोबत निघाले.

ट्रक मालक याने फिर्यादीला फोन लावले असता तो फोन उचलत नसल्याने व नंतर चालक व दोन्ही मजुरांचे फोन बंद झाल्याने त्यांना संशय आल्याने त्यांच्या बाबतीत त्यांच्या देवरी येथे राहणारा भाऊ रियाज कुरेशी ला सांगितले त्यांनी सदर बाब ही देवरी पोलिसांना कळविले सदरची माहिती प्राप्त होताच देवरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिंगनजुडे यांनी सदर घटनेबाबत पोलीस अधिक्षक गोंदिया विश्व पानसरे यांनी माहिती दिली व पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पोलीस स्टॉप सह सदर ट्रकचा शोध घेणे कामी छत्तीसगडच्या मार्गावर सूचनेप्रमाणे रवाना झाले असता छत्तीसगड मधील चीचोला गावच्या पुढे त्यांनी नमूद क्रमांक ट्रक पळून जाताना दिसला असता त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो ट्रक न थांबविता समोर पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. ट्रक सोबत जात असलेले टाटा झेस्ट वाहनाच्या सुद्धा संशय आल्याने ट्रक व झेस्टा वाहन यांना मोठ्या शिताफीने थांबून जवळच्या धाब्यावर घेऊन गेले त्यांना पोलीस स्टेशन चीचोला येथील ठाणेदारांना माहिती देऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ट्रक व झेस्टा वाहन व त्यातील इसमांना व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर ट्रक व वाहन व त्यातील इसमांना पोलीस स्टेशन देवरी येथे आणण्यात आले व फिर्यादी नामे मोहम्मद इरशाद मोहम्मद फारुक कुरेशी 28 वर्ष राहणार शिवनी मध्य प्रदेश यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवरी येथे 15/9/2021 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/2021कलम 395, 365 भादंवि अन्वये नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे पोलीस स्टेशन देवरी हे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम सोनकर वय 29 वर्षे , विशाल कुशवाहा वय 22 वर्ष ,रोशन सिंग वय 25 वर्ष ,करण सिंग वय 25 वर्ष , लोकेश सिंग वय 24 वर्षे सर्व राहणार भिलाई यांना दिनांक 15/9/2021 सकाळी 6:12 वाजता अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून चोरी गेलेला ट्रक क्रमांक MH 42 G 6617 मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले टाटा झेस्ट वाहन क्रमांक CG 07BK 5180 असा एकूण 22 लाख 23 हजार रुपये जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर उपविभागीय पोलिस अधिकारी जालंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे पोलीस स्टेशन देवरी, पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे , पोलीस शिपाई हातझाडे ,पोलीस शिपाई जागळे पोलीस स्टेशन यांनी केली असून पोलिस अधीक्षक श्विश्व पानसरे यांनी सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारांचे अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share