गडचिरोलीसह राज्यात पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा

गडचिरोली : ऐन गणेशोत्सवात राज्यावर अस्मानी संकट आले आहे. पुढील चार दिवसात गडचिरोली आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
गडचिरोलीसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने कहर केला असतानाच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवामानात झालेल्या या उल्लेखनीय बदलामुळे चार ते पाच दिवसात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. सातत्याने सरीवर सरी कोसळत असून, श्री गणेशाचे स्वागतदेखील वरूण राजाने मोठ्या थाटामाटात केले. पावसाने संततधार कायम ठेवली असली तरीदेखील गणेश भक्तांचा उत्साह कायम होता.
रत्नागिरी, पुणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट तर सातारा, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावीत, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share