भुपेन्द्र मस्के/ विशेष प्रतिनिधी


गोंदिया २१: सन २०२०-२०२१ खरीप हंगामातील धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजुनही दिलासा मिळायला आहे. महामंडळानी धान खरेदी करण्यास सुरुवात केलेली नाही. यामध्ये धान्य खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व अन्य मागण्यांबाबत धान खरेदी केंद्राचे संचालक व कर्मचारी नाराज व असहकाराच्या भावनेने काम करत आहेत. त्यामुळे यंदा केंद्रांवर धानखरेदी प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
उत्पादन झाल्यानंतर खरेदीची प्रक्रिया केंद्र संचालकांमार्फत राबविण्यात येतो तसे न होता जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार व विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक मात्र धान खरेदी केंद्राचे उद्घघाटन करून अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचे जिल्हात चित्र आहे. यावरून श्रेय कसे घ्यायचे हे यांचेकडुन शिकावे लागेल.
शेतकऱ्यांनी आपले धान पिक हे गोळा करून ठेऊन मळणी करण्याकरिता धान खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पहात होता त्याचवेळी अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाले. त्यामुळे अस्मानी संकटात असतांनी आजवर जिल्ह्यात न झालेली धान खरेदी यामुळे सुलतानी संकटामुळे शेतकरी फार
खचला. आपल्याजवळचे धान्य व्यापाऱ्याला विकल्यावर एमएसपी मिळणार नाही. पण आर्थिक विवंचना सुटेल या भावनेतून दिवाळी साजरी केली. या संपूर्ण त्रिकुटात शेतकरी भरडला गेला.

प्रस्तुत प्रतिनिधीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवाद घातल्यानंतर नाव न सांगण्याच्या अटीवर सांगीतले कि आमच्याही सेवा व कर्तव्याच्या अठरा मागण्या पुर्णत्वास जाईपर्यंत आम्ही खरेदी केंद्र सुरू करणार नाही.

यावरून धान खरेदी केंद्राचे भव्यदिव्य उद्घघाटन करून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न धावता काय साध्य करतात हे सत्ताधारी? असा प्रश्न धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे.

Share