स्पीड लिमिट मोडणाऱ्यांना 1 कोटींचा दणका

गोंदिया 11: रस्त्यावर वाहन चालवितांना ट्राफिक नियम पाळणे आवश्यक आहे. आपल्यासह समोरील व्यक्तीच्या सुरक्षितेसाठी नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. स्पीड लिमिट नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर यावर्षी तब्बल 10,144 कारवाया महामार्ग पोलिसांनी केल्या आहेत.

महामार्ग पोलीस स्पीड लिमिट उल्लंघन करणाऱ्या नजर ठेवून आहे. यावर्षी स्पीड लिमिट मोडणाऱ्या 10144 वाहनांवर केली असून त्यांना 1 कोटी 44 हजार रुपयांचे दंड ठोकले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share