डॉ. सुजित टेटे

देवरी २१: सुरु हंगामातील धानखरेदीच्या संबंधात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गोंदिया जिल्हा संघाची जिल्हा स्तरीय सभा देवरी येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा शक्ति मैदानाच्या सभागृहात शुक्रवारी (ता.२० नोव्हेम्बर) रोजी जिल्ह्यातील सर्व आदिवासी संस्थेचे अध्यक्ष व संचालकांच्या संयुक्त रित्या उपस्थितित पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा संस्थेच्या संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर मडावी हे होते.या प्रसंगी जिल्हा संघाचे सचिव हरीश कोहड़े,मरामजोब संस्थेचे अध्यक्ष रमेश ताराम, बोरगांव बाजार संस्थेचे सुखचंद राऊत, लोहारा संस्थेचे कृपाशंकर गोपाले, पालीवाल यांच्यासह जिल्ह्यातील संस्थेचे अध्यक्ष व संचालक बहुसंख्येने उपस्थित होते.
या सभेत सुरु हँगामातील धान खरेदीच्या संबंधात विविध विषयावर चर्चा करण्यात आले. यात आदिवासी विकास महामंडड़ा द्वारे सुरु असलेल्या संस्थेच्या प्रत्येक धान खरेदी केन्द्रावर ग्रेडरची सोय करावी, बारदाना पुरवठा, स्टेशनरी पुरवठा, मागील हँगाम २०१९-२० मधील शेतकऱ्यांचे बारदाना परत करने, संस्थेचे मागील हँगामातील थकित कमीशन त्वरित मिळने, शासनाकड़ून संस्थेवर लावलेल्या एस.आय.टी. चौकशी बाबद आणि महामंडड़ा द्वारे ग्रेडर ची सोय न केल्यास संस्थेला मोबदला देण्याबाबद अशा विविध विषयावर सभेत सविस्तर चर्चा करुण या सर्व विषयाला आदिवासी विकास महामंडड़ाने गांभीर्याने विचारात घेवून सर्व आदिवासी संस्थेला सहकार्य करण्याची मागणी या सभेच्या माध्यमातून करण्यात आली.
या बाबद सभेत घेतलेले प्रस्तावाचे निवेदन संबंधित विभागाला पाठविन्यात आले आहे.

Share