अवैध जुगार खेळणाऱ्या 15 इसमावर देवरी पोलीसांची धाड

देवरी 07: पोलीस अधिक्षक सा. गोंदिया यांचे आदेशान्वये तसेच अप्पर पोलीस अधिक्षक सा, गोंदिया कैप देवरी व उपविभागीय पोलीस अधिकार देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या 52 तासपत्यावर जुगार खेळणाऱ्यावर आळा घालण्यासाठी मारबत सनाच्या पुर्वसंध्येला पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत 15 इसमांवर कार्यवाही करण्यात आली.

दि. 06/09/2021 रोजी मारबतच्या पुर्वसंध्येला रात्री 22/00 व सुमारास ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे पोलीस स्टेशन देवरी यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे मौजा परसटोला,देवरी येथे काही इसम 52 तासपत्यावर पैसे लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहीती मिळाल्याने ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टॉफ ला मौजा परसटोला,देवरी येथे आफताब डेकोरेशननचे दुकानासमोरील चौकात काही इसम पत्याचा जुगार खेळतानी दिसुन आल्याने पंचासमक्ष पोलीस स्टाफनी त्यांचेवर रेड घातली असता फळावर 52 तासपत्ते, नगदी 1550/रु. तसेच आरोपीतांचे झडतीत 900/- रु नगदी, एक एम.आय कंपनीचा मोबाईल कि, 5000/- रु. , असा एकुण 7450 /- रु.चा मुद्देमाल मिळुन आला. घटनास्थळी तिन आरोपी नामे 1) गजानन इतवारी सार्वे वय 22 वर्ष,2) अमोल अनिल बडोले वया 25 वर्ष दोन्ही रा. परसटोला ,देवरी 3) नितेश केशव कोहळे वय 32 वर्षा रा. वार्ड क्र. 5 देवरी हे मिळून आले व इतर नऊ आरोपी नामे 1) बबलु मेश्राम, 2) अनिल नेताम,3) विजय मेश्राम,4) अनिल सिरसाम,5) आशु ठाकरे,6) तेजु मेश्राम,7) रोहीत भोयर,8) जापान मडावी सर्व रा. परसटोला हे नऊ लोक पळुन गेले बाराही आरोपितांवर फिर्यादी पोना हेमंत मस्के ब न. 232 पोस्टे देवरी यांचे रिपोर्टवरुन अपराध क्र. 222/2021 कलम 12 (अ) मजुका, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच दुसऱ्या कार्यवाही मध्ये मस्कऱ्या चौक देवरी येथे काही इसम 52 तासपत्यावर पैशाचे हारजीतचा जुगार खेलत असल्याची माहीती मिळाल्याने पोलीस स्टाफनी त्यांचेवर रेड घातली असता फळावर 600 रु. नगदी, 52 तासपत्ते तसेच आरोपीतांचे अंगझडतीत 2200 रु नगदी, तिन मोबाईल कि. 9700/- रु. असा एकुण 12500 /- रु.चा मुद्देमाल मिळुन आला.सदर कार्यवाहीत आरोपी 1) विनोद दिलीप सरोजकर वय 37 वर्ष रा, मस्कऱ्या चौक, देवरी,3) हितेश धनराज सोनवाने वय 28 वर्ष रा. वार्ड क्र. 12, देवरी,3) महेश मनोहर नागदेवे वय 30 वर्ष, रा. वार्ड क्र. 12, देवरी यांचेवर फिर्यादी पोहवा झिंगु मडावी ब.न. 767 पो.सेटा देवरी यांचे रीपोर्टवरुन अपराध क्र. 222/2021 कलम 12 (अ) मजुका, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर दोन्ही कार्यवाहीमध्ये आरोपितांकडुन एकुण 19950/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाही मा, ठाणेदार श्री रेवचंद सिंगनजुडे पोस्टे देवरी, पोलीस स्टॉफ पोहवा मडावी/767, गायधने 878, पोना करंजेकर/1154, पोना मस्के/232, चौधरी/1606,पोशी हातझाडे/1766, पोशी डोहळे/998, शेंडे/1746, नेवारे/2215. धर्म/159, मेंटे 1977 यांनी केलेली आहे

Print Friendly, PDF & Email
Share