अखेर देवरी तालुक्यासाठी 3 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध…

◾️‘भंगार ऍम्ब्युलन्समुळे’ देवरीवासी भोगतात नरक यातना’ या मथड्याखाली वृत्त झाले होते प्रकाशित

◾️प्रहार टाईम्स आणि प्रिंट मीडियाने दाखविली होती भंगार रुग्णवाहिकेची सद्यस्थिती

देवरी 04(प्रा. डॉ. सुजित टेटे ): कोरोना काळात भौतिक सोयी अभावी आरोग्य विभागाची चांगलीच कोंडी झाली होती. नक्षलग्रस्त आणि बहुल भाग म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था आणि मुदत बाह्य भंगार रुग्णवाहिका या विषयी प्रहार टाईम्स आणि प्रिंट मीडिया ने वृत्त प्रकाशितकरून हि बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती.

याकडे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने विशेष लक्ष देत देवरी तालुक्यासाठी 3 नवीन रुग्णवाहिकेची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये तालुक्यातील फुटाणा , घोनाडी , ककोडी या आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधृढ करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून 463 रुग्णवाहिकेची खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका राज्यातील सर्व जिल्हाच्या मागणीनुसार पाठविण्यात येणार आहेत. गोंदिया जिल्ह्याला 25 नवीन रुग्णवाहिका मिळणार असून ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा मिळणार आहे.

जिल्हात प्राप्त होणाऱ्या 25 रुग्णवाहिका क्रमांक 102 सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये गरोदर माता व प्रसूतीसाठी 102 क्रमांक उपलब्ध असून ग्रामीण भागातील लोकांना या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

?’भंगार ऍम्बुलन्स’ मुळे देवरीवासी भोगतात नरक यातना…!

Print Friendly, PDF & Email
Share