प्रतिनिधी/पवन के.निरगुळे


लाखनी१८: येथे पदवीधर निवडणूक सम्बन्धित साकोली विधानसभा क्षेत्राची सयुंक्त बैठक घेण्यात आली यावेळी पदवीधर संघामधून निवडणूक लढणारे आपल्या पक्षाचे लोकप्रिय उमेदवार संदीप जी जोशी यांच्या प्रचारार्थ माननीय खासदार सुनीलजी मेंढे,जिल्हाध्यक्ष प्रदीप जी पडोळे, माजी आमदार बाळा भाऊ काशिवर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली या वेळी मा.खासदार सुनीलजी मेंढे,जिल्हाध्यक्ष प्रदीपजी पडोळे व माजी आमदार बालाभाऊ काशिवार यांनी पदविधर निवडणूक सम्बंधित मार्गदर्शन केले व आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान कसे मिळवता येईल या करिता मार्गदर्शन केले व जोमाने काम करा असे आवाहन केले.यावेळी या कार्यक्रमाला शिवरामजी गिरिपुंजे,भरतजी खंडाईत ,राजेशजी बांते ,उल्हासजी फडके,अंगेंशजी बेलपांडे ,किशोरजी वाघाये ,महेंद्रजी निंबार्ते,धनंजय घाटबांधे, विनोदजी ठाकरे,लखनजी बर्वे, बोलणे सर, तु.रा भुसारी,सौ.ज्योती ताई निखाडे,सौ.धनवांता ताई राऊत,तसेच साकोली विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिति सदस्य,नगरसेवक, नगरसेविका,जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख, शक्ति केन्द्र प्रमुख,व कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी मंच संचालन-बाळा भाऊ शिवणकर यांनी केले तर आभार-संदीप भांडारकर यांनी मानले,

Share