पर्यावरणजागृती रांगोळी स्पर्धा व आकाशकंदील बनवा स्पर्धा लाखनी बसस्थानकावर आयोजितआकर्षक रांगोळ्यांनी प्रवाशांचे घेतले लक्ष वेधून

अजिंक्य भांडारकर

लाखनी 16:-
येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब,.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका लाखनी तसेच नेफडो जिल्हा भंडारा तर्फे लागोपाठ 15 व्या वर्षी पर्यावरणस्नेही दिपावली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावर्षी कोरोना च्या आजारामुळे व पर्यावरण घातक मोठ्या आवाजाचे फटाखे न फोडण्याकरिता पर्यावरण जागृती पत्रक तिन्ही गावात सावरी,मुरमाडी व लाखनी गावात ग्रीनफ्रेंड्स तर्फे वाटण्यात आले.तसेच समाजमाध्यमाद्वारे सुद्धा याचा भरपूर प्रचार करण्यात आला. त्याचप्रमाणे पर्यावरणस्नेही दिपावली अधिक चांगल्याप्रकारे साजरी करण्याकरीता ग्रीनफ्रेंड्स, अभाअनिस नेफडो तर्फे पर्यावरण जागृती रांगोळी स्पर्धा तसेच बालकदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संदेशपर आकाशकंदील बनवा स्पर्धा सुद्धा लाखनी बसस्थानकावर आयोजित करण्यात आली. ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने,पदाधिकारी दिनकर कालेजवार,योगेश वंजारी,गजानन गभने,योगेश वंजारी,अध्यक्ष अशोक वैद्य यांनी स्पर्धकांना पर्यावरण रांगोळी कशी काढावी याकरिता सुरवातीला मार्गदर्शन केले.
पर्यावरण जागृती रांगोळी स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांनी फटाखामुक्त,प्रदूषणमुक्त दिवाळी, पर्यावरणाच्या इतर समस्या,यात शिकार,वृक्षतोड,तसेच कारखाना प्रदूषण, अक्षय ऊर्जा ,तसेच यावर्षीच्या कोरोना आजाराच्या प्रकोपावर आधारित अतिशय सुंदर व आकर्षक रांगोळ्या काढून पर्यावरणस्नेही रांगोळीचा संदेश बसस्थानक प्रवाशी व परिसरातील नागरिकाना दिला.रांगोळ्याच्या समोरील दिवाळीचे दिवे शिवालय कन्सस्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक दिपेश गौतम साकोली बसआगार व्यवस्थापक गौतम शेंडे,लाखनी वाहतूक नियंत्रक बी. एन. डहाके यांनी प्रज्वलित केले लाखनी बसस्थानकवर पर्यावरणस्नेही दिपावली उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथीनी सर्व रांगोळी स्पर्धक तसेच आकाशकंदील स्पर्धक यांच्या सुंदर कलाकृतीचे कौतूक केले.
सिद्धिविनायक हॉस्पिटल डॉ. मनोज आगलावे पुरस्कृत पर्यावरण संदेश रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पूनम झिंगरे हिच्या सर्व पर्यावरण समस्या विषयक रांगोळीला प्राप्त झाला. दुसरा क्रमांक कु.प्रगती तरोणे हिच्या सुद्धा सर्व पर्यावरण समस्या दर्शविणारी रांगोळीला प्राप्त झाला. तिसरा क्रमांक डिंपल सतीश उइके हिच्या ‘कोरोनायोद्धा व विश्व’ विषयक रांगोळीला प्राप्त झाला. चतुर्थ क्रमांक सलोनी युवराज कोरे हिच्या अक्षयऊर्जा रांगोळीला प्राप्त झाला. पाचवा क्रमांक आचल राऊत कोरोना योद्धावीर या रांगोळीला प्राप्त झाला . सहावा क्रमांक हर्षल मेंढे हिच्या पाणीबचत या रांगोळीला प्राप्त झाला तर गायत्री वैद्य हिच्या झाडाची वेदना या रांगोळीला सातवा क्रमांक प्राप्त झाला. मनस्वी गभने हिच्या शेतकरी जीवन विषय रांगोळीला आठवा क्रमांक प्राप्त झाला.प्रोत्साहनपर क्रमांक ओंकार चाचेरे,आर्यन देशमुख,कार्तिक सेलोकर,हरीश सेलोकर यांच्या रांगोळीला प्राप्त झाला.दिपावली व बालकदिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पर्यावरण संदेश आकाशकंदील बनवा स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी प्राणी,पक्षी यांचे चित्रे तसेच पर्यावरण संदेशाचा वापर केला.या अशोका बिल्डकान पुरस्कृत पर्यावरण संदेश आकाशकंदील बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक मनस्वी गभने हिला तर व्दितीय क्रमांक गायत्री वैद्य, तृतीय क्रमांक ओंकार चाचेरे चतुर्थ आर्यन धरमसारे,आर्यन देशमुख,कार्तिक सेलोकर यांना तर प्रोत्साहनपर क्रमांक पंकज देशमुख याला प्राप्त झाला. कनिष्ठ महाविद्यालय गटात आशिष खेडकर व राहुल नान्हे यांना प्राप्त झाला.दोन्ही स्पर्धेचे परीक्षण दिनकर कालेजवार ,अशोक वैद्य व प्रा. अशोक गायधने यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वितेकरिता ग्रीनफ्रेंड्स, अंनिस व नेफडो चे वैष्णव देशमुख, पंकज देशमुख,रेहान चाचेरे ,आर्यन धरमसारे,आर्यन देशमुख,हरीश सेलोकर,कार्तिक सेलोकर, ओंकार चाचेरे,,बसस्थानक सफाई कामगार शैलेश भैसारे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

Share