ककोडी प्राथमिक आरोग्य केन्द्र वाऱ्यावर…

चिचगड 20: ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन महिन्या पासून डाँक्टरची जागा रिक्त आहे . त्यामुळे आरोग्य केन्द्र वाऱ्यावर आहे असे म्हणाले तर चालेल.
ककोडी ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१४ पासुन स्थायी M.B.B.S. डाँक्टर ची जागा रिक्त आहे. जे डाँक्टर येतात ते डेपूटेशन वर नाहीतर ११ महिन्याचा कंत्राटी बेसिक वर तेही B.A.M.S. असतात.
ककोडी प्राथमिक आरोग्य केन्द्र ही मोठी आरोग्य केन्द्र आहे. ह्या आरोग्य केन्द्रला सहा सब सेंन्टर असून लहान मोठी ३७ गावे येतात. ककोडी, चिल्हाटी, मुरमाडी,कथलिटोला, तुमडीकसा, महतेखेडा, कोसबि, रेहाळी, केसोरी, ऊचेपुर, महाका, लेडींजोब, जपकसा, मिसपिरी, धमदीटोला, धोबाटोला,नवाटोला, कुनबिटोला , वडेकसा, चिपोटा, सोरीटोला, शम्भुटोला, गोटानपार, धवलखेडी , असे लहनमोठी ३७ गावे ककोडी प्राथमिक आरोग्य केन्द्रांत येतात . ह्या सर्व गावातील जनतेचे आरोग्य , व त्यांची सेवा ह्या आरोग्य केन्द्रावर अवलंबुन आहे. हे सर्व गावे अतिशय दुर्गम आदिवासी क्षेत्रात येतात.
आता पावसाळ्यात साप,विंचू सारख्या जहरेली प्राणी पासून याची भीती नेहमी असते . एवढ्या मोठ्या परिक्षेत्रात ऐक्सीडेन्ट, मलेरिया, गरोदर मातांचे बाळंतपणासाठी आरोग्य केन्द्रावर डॉक्टर नसल्याने त्यांचे इलाज वेळेवर होत नाही.
डाँक्टर नसल्याने वेळेवर इलाजासाठी रूग्णांना देवरी, गोदिंया ला जावे लागते. त्यामुळे त्यांची आर्थीक, शारिरीक, तसेच मानसिक त्रास होत आहे .
ककोडी आरोग्य केंन्द्राची देखरेख तालुका वैद्यकीय अधिकारी यांचाकडे आहे . जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांचाकडे आहे, परंतु त्यांचे ह्याकडे , ह्या आरोग्य केंन्द्रावर अजिबात लक्ष नाही , असे दिसुन येते.
ककोडी आरोग्य केन्द्राला स्थायी दोन M. B. B. S. आणि ऐक B. A. M. S. डाँक्टर ची नियुक्ती असुन २०१४ पासुन स्थाई डाँक्टर मिळालेला नाही.
देशात कोविड १९. महामारी च्या काळात आरोग्य विभागाचे हे हाल आहेत . ह्या सर्व समस्या गांभीर्याने लक्षात घेत आरोग्य शासनाने ऐक स्थायी M. B. B. S. डाँक्टरची नियुक्ती करावी.
स्थायी डाँक्टर लवकर नाहि मिळाला तर मोठा आंदोलन करण्यात येइल असे स्थानिक जनतेने केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share