देवरी तालुक्यातील ओवारा येथिल दिड वर्षाच्या विधी लाडे हिचा बादली मधे बुड़ुन मृत्यु

दिवाळी च्या दिवशी लाडे कुटुंबावर दुःखाचे डोंगर

डॉ.सुजित टेटे / संपादक

देवरी/ओवारा १४: आज दिवाळीचा सण संपूर्ण देश साजरा करत असतांना लाडे कुटुंबीया समोर दुःखाचे डोंगर उभे राहिले आहे. घरची सर्व लोक दिवाळी तयारी करत असतांना सकाळी विधी महेंद्र लाडे ओवारा वय दिड वर्षे हि घरी खेळत होती परंतु खेळता खेळता शेजारी असलेल्या पाण्याच्या बादली मध्ये पडली आणि तिचा त्यातच दुःखद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ऐन दिवाळीच्या दिवशी लाडे परिवारावर दुःखाचा आभाळ कोसळलेला असुन सर्वी कडे चिमुकली साठी हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी गावचे सरपंच , पोलिसपाटिल आणि गावकरी उपस्थित होते आणि कुटुंबाला सांतवना दिली.

Share