ग्रा.पं. लोहारा येथील शिपाई भरतीत घोळ झाल्याचा आरोप, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी

देवरी/ लोहारा 01: ग्रापं लोहारा येथे रिक्त झालेल्या शिपाई पदासाठी नुकतीच 29 जुलै ला लेखी परीक्षा घेण्यात आलेले असून त्याचा निकाल काल जाहीर करताच या पदासाठी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी परीक्षेत घोळ झाला असून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी गावाचे सरपंच यांना लेखी निवेदन आणि तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि शिपाई पदाची रिक्त जागा भरण्यासाठी 29 जुलै ला लेखी परीक्षा घेण्यात आली असून त्याची पात्रता 12 वी पास होती. सदर परीक्षेत 21 उमेदवार सहभागी झाले असून परीक्षेत 25 प्रश्न विचारण्यात आले होते. घेण्यात आलेली 50 गुणांची परीक्षा होती. परंतु निवड करण्यात आलेल्या संदीप लटये उमेदवाराला 44 गुण कसे मिळाले असे आरोप इतर उमेदवारांनी निवेदन केले असून सदर पद भरती परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलेली आहे. पात्र उमेदवार इतके गुण घेऊ शकत नाही त्यामुळे परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार बघता पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी राकेश सोनवणे , हरीश उके , राहुल मेश्राम आणि इतर उमेदवारांनी यांनी केली आहे.

सरपंच : सदर झालेल्या प्रकाराचे निवेदन प्राप्त झाले असून ग्रामपंचायत बैठकीत चर्चा करून योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार – पन्नालाल चौधरी, सरपंच ग्रापं लोहारा

सचिव : पंचायत समिती देवरीच्या परीक्षकांनी परीक्षा घेतली असून पारदर्शक पद्धतीने परीक्षा आणि निकाल जाहीर करण्यात आला. कागद पत्राची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार. मेश्राम सचिव ग्रापं लोहारा

Print Friendly, PDF & Email
Share