धक्कादायक! ट्रॅक्टर चालकाचा नियंत्रण सुटल्याने 4 गंभीर

देवरी / चिचगड 31: येथील पोलीस स्टेशन समोर ट्रॅक्टर वाहन चालकाचा नियंत्रन सुटल्याने मोठा अपघात झाला असून रस्त्यावर चालत असलेल्या पोलिस जवानासह तिन लोकानां ट्रॅक्टर ने जबर धडक दिली त्यात चारही व्यक्ती गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. अपघातातील गंभीर जखमींना प्रथोमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे नेण्यात आले पंरतु अपघातात जखमी झालेल्या रुग्नांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीत अविनाश यादवराव निकोडे रा. सिंगनडोह वय (१२) , यादवराव निकोडे रा . सिंगनडोह वय (५०) , लखनलाल रघुजी बडोले रा. चिचगड वय (७२) , प्रकाश नामदेव शिंदे , पोलीस जवान वय (३०) यांचा समावेश आहे.

प्राप्त माहीतीनुसार अपघातातील ट्रॅक्टर नवीन असुन ट्रॅक्टरचा चालक अश्विन रुशेस्वर शहारे रा. अंभोरा वय (२८) वर्ष, असे असुन या ट्रॅक्टर वाहन चालकाकडे वाहन चालविन्याचा परवाना देखील नसल्याचे माहिती समोर येत आहे. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन चिचगड येथे कलम २७९,३३७ ,३३८ भादवि ,सह.कलम १८४ मोटार वाहन कायद्या अंतर्गत चालकाविरुद्ध गुन्हा करण्यात आले असुन तपास सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •