गोंदिया जिल्ह्यातील 179 पोलीस कर्मचार्‍यांची बदली

शासनाचे आदेश धडकल्याने पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची कार्यवाही

गोंदिया 31 : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे आदेश क्रमांक एसआरव्ही 21 जुलै व महाराष्ट्र शासनाचे आदेश क्रमांक एसआरव्ही 29 जुलैनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील गोंदिया पोलीस कर्मचार्‍यांच्या बदलीचे आदेश जाहीर केले. यात पोलीस कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदली अंतर्गत पात्र 179 पोलीस कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्वसाधारण बदलीस पात्र पोलीस कर्मचार्‍यांच्या आस्थापना मंडळासमक्ष बदलीसंबंधात आवडीचे ठिकाण व समस्या जाणून घेण्यासाठी 23 व 24 जुलै रोजी बोलावून घेतले होते. यात 23 जुलै रोजी 11 सहायक फौजदार, 23 पोलीस हवलदार व 44 पोलीस नायक तथा 24 जुलै रोजी 83 पोलीस शिपाई व 18 वाहन चालक आस्थापना मंडळासमक्ष समक्ष उपस्थित झाले. या वेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून रिक्त पदांची संख्या दाखवून त्यानुसार त्यांच्या आवडीचे रिक्त ठिकाण व मागणी केलेल्या ठिकाणी बदली करण्यात आली. त्यासाठी 31 जुलै 2021 रोजी 179 पोलीस कर्मचार्‍यांच्या नवीन ठिकाणी बदलीचे आदेश जाहीर करण्यात आले. सदर बदली प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •