विधानसभा क्षेत्रातील बचतगटांना शिवभोजन केन्द्राची मंजूरी द्या

★ आमदार कोरोटे यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याकडे मागणी.

देवरी, ता.३१ :महाविकास आघाडी तर्फे संपूर्ण राज्यात शिवभोजन थाळी ही योजना सुरु करन्यात आली आहे. याच धरतीवर आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील उर्वरित गावातही व्यक्ति व बचत गटांना सुद्धा शिवभोजन केंद्र मंजूर करण्या बाबद एक निवेदन आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मंगळवार(ता.२६ जुलै) रोजी भेटून चर्चा केली आणि आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्रातील शिवभोजन केंद्रांना मंजूरी देण्याची मागणी केली.
दिलेल्या निवेदनात आमदार सहषराम कोरोटे यांनी म्हटले आहे की, माझ्या मतदार संघात गोरगरीब लोकांना जेवनाची सोय उपलब्ध करुण देण्या सम्बन्धित पूर्वीच एक निवेदन सादर केले होते. यात फक्त एकच शिव भोजन केन्द्राला मंजूरी देवुन ते शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. उर्वरित गावांमध्ये देवरी तालुका- चिचगड, ककोडी व पालान्दूर(जमी.) आणी आमगांव तालुका-आमगांव शहर व रिसामा तसेच सालेकसा तालुका-सालेकसा शहर, दर्रेकसा व साखरी टोला या गावाचा समावेश असून या गावातील व्यक्ति किंवा बचतगटांना शिवभोजन केन्द्राची मंजूरी द्यावी. अशी मागणी आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी मुंबई येथे भेट घेवून चर्चा केली. उपरोक्त मागनीचे निवेदन ही सादर केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सदर मागणी त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार सहषराम कोरोटे यांना दिले.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •