गुजरातच्या मैदानात सालेकसातील मुलींनी गाजवले मैदान

राष्ट्रीय खेळात मिळवले ४ सुवर्णपदक सालेकसा: सालेकसा सारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातून तैक्वाडो सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळात ४ मुलींनी उंच भरारी घेत सुवर्ण पदक पटकावले. गुजरात येथील जामनगर येथे आयोजित ४ थे राष्ट्रीय युवा खेळ स्पर्धेत सहभागी होऊन सालेकसातील मुलींनी तैक्वाडो या खेळात सुवर्णपदक मिळवले. गोल्डी भाटिया यांच्या नेतृत्वाखाली सालेकसा येथील ४ विद्यार्थिनींनी 3 दिवसीय राष्ट्रिय स्पर्धेत तैक्वाडो खेळात भाग घेतले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी पार पाडत उपस्थितींना मंत्रमुग्ध करत प्रतिद्वंदीना चांगलेच पाणी पाजले.विशेष म्हणजे उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्व मुलींचे तोंड भरून कौतुक केले.रिया अहिरकर, प्रांवी प्रधान, शाक्षी शिवणकर, विद्या नागपुरे असे या मुलींचे नाव आहेत.

ग्रामीण भागातही स्पर्धेची उत्कट इच्छा आणि गुणवत्ता आहे व याकडे शासनाने लक्ष दिल्यास नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव लौकिक करणारे स्पर्धक घडू शकतील, अशी भावना मार्गदर्शक शिक्षक गोल्डी भाटिया यांनी व्यक्त केली.चारही मुलींची कामगिरी अभिमानास्पद असून त्यांनी केलेल्या कामाची सर्व स्तरावरून स्तुती होत आहे. सालेकसा पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले, तहसीलदार कांबळे यांनीही या मुलींचे कौतुक केले आहे.मुलींनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे शिक्षक गोल्डी भाटिया, दुलीचंद मेश्राम, नरेश बोहरे व त्यांच्या पालकांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share