बँक दिवाळखोरीत निघाल्‍यास ठेवीदारांना ९० दिवसांमध्‍ये पैसे परत मिळणार

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: बँक दिवाळखोरीत निघाल्‍यास ठेवीदारांच्‍या पैसे परत मिळण्‍याबाबत केंद्र सरकारने आज महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय मंत्रीमंडळाने ‘ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळ विधेयक २०२१’ला (डीआयसीजीसी) मंजुरी दिली. ‘डीआयसीजीसी’ विधेयकास मंजुरी मिळाल्‍यामुळे आता एखादी बँक दिवाळखोरीत निघाल्‍यास ठेवीदारांना ९० दिवसांमध्‍ये पैसे परत मिळणार आहेत.

देशात मागील काही वर्षांमध्‍ये अनेक बँका दिवाळखोरीत निघाल्‍या आहेत.पीएमसी बँक, येस, लक्ष्‍मी बँक दिवाळखोरीत निघाल्‍या आहेत. यामुळे हजारो ठेवीदार आपल्‍या हक्‍कांच्‍या पैशासाठी अजून प्रतिक्षेत आहेत. नव्‍या नियमामुळे बँक दिवाळखोरीत निघाल्‍यास ९० दिवसांमध्‍ये १ ते ५ लाख रुपयांपर्यंतच्‍या ठेवी देण्‍यात येतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

यापूर्वी बँका दिवाळखोरीत निघाल्‍यास ठेवीदारांच्‍या पैसे किती कालवधीमध्‍ये परत मिळणार याची निश्‍चिती नव्‍हती. आता केंद्रीय मंत्रीमंडळातील निर्णयांमुळे देशातील कोटयवधी बँक ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share