कोरोनाच्या काळात अहोरात्र रुग्णांची ने-आण करणार्‍या रुग्णवाहिका चालकाचा सत्कार

देवरी 26: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह या कार्यक्रमांतर्गत 26/7/21 ला देवरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने कोरोनाच्या काळामध्ये अहोरात्र रुग्णांची ने-आण करणार्‍या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका 102 व 108 च्या सुशील खंगार, योगेश पुरी ,लांडे, बोपचे, वाहनचालकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर सोहळ्याला भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. देवकीताई मरई ,नगरपंचायत देवरी च्या माजी नगराध्यक्षा सौ. कौसल्याबाई कुंभरे, सौ.नूतन ताई सयाम जिल्हा उपाध्यक्ष सौ. रचनाताई उजवणे , सौ.कल्पनाताई वालोदे ,सौ. अंबिकाताई बंजार,सौ. सुनीताताई जांभुळकर,सौ. डिलेश्वरी बिंझाडे बाळक्रुष्नजी गायधने, डॉ.येरने आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share