माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप आणि वृक्षारोपण –

देवरी 25-
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. 22 जुलैला देवरी तालुका भाजप युवा मोर्चा आणि विद्यार्थी आघाडीच्या संयुक्त विद्यमाने युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंदरजितसिंग भाटीया यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करुन विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
तत्पूर्वी महाराष्ट्रात दोन वर्षापासून एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती बंद असल्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न भंग झाल्यामुळे निराश होऊन आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या परिवाराला देवेंद्र फडणवीस यांनी वीस लाखाची मदत केल्याबद्दल धन्यवाद तथा आभार कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शाहू , अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शिंदे, युवा मोर्चा तालुका महामंत्री सोनू चोपकर, नितेश वालोदे, विनोद सूर्यवंशी, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका महामंत्री माजीद खान, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, सचिव देवेंद्र गायधने, हितेश हटवार, पियुष दखने आदी बहुसंख्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share