रावनवाड़ी ते कामठा चौक आमगांव पर्यन्त रस्त्याची दुरुस्ती लवकरच पूर्ण होणार

★ २ कोटि ४० लक्ष रु.निधि मंजूर
★ आमदार कोरोटे यांच्या पुढाकार व प्रयत्नाला यश

आमगांव/देवरी,ता.२४: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील रावनवाड़ी ते कामठा चौक आमगांव पर्यन्त च्या रोडाचे बांधकाम अनेक दिवसांपासून रेंगाळलेले आहे. या विषयाला मागील २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार सहषराम कोरोटे यांनी उचलून धरला. परंतु कोरोना संसर्ग काळात देशासह राज्यातील शासनाच्या आर्थिक व तांत्रिक अड़ीअड़चनी मुळे सदर रोडाचे बांधकाम निधी अभावी थांबले. परिणामी आता या रोडामुळे येथील परिसरातील लोकांना होणाऱ्या अड़ीअड़चनी बघता आमदार सहषराम कोरोटे यांनी सावर्जनिक बांधकाम विभाग नागपुर चे अधीक्षक अभियंता सरदेशमुख यांच्याशी या विषयाला धरून भ्रमण ध्वनीवर गंभीर चर्चा} केली आणि अखेर सदर रोडाच्या दुरुस्ती करिता विशेष दुरुस्ती निधि २ कोटि ४० लक्ष रु.निधी मंजूर करुण घेतली. आता या रोडाच्या दुरुस्तीचे काम लवकर सुरु होणार असल्याची माहिती आमदार सहषराम कोरोटे यांनी शुक्रवारी(ता. २३ जुलै) रोजी प्रासिद्ध केलेल्या प्रसिद्धि पत्रकातुन दिली आहे.
प्रसिद्धि पत्रकात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की, रावनवाड़ी ते कामठा चौक आमगांव पर्यतच्या रोडाचे बांधकाम मागील अनेक दिवसांपासून रेंगाळलेले आहे. या रोडाच्या पूर्णनिर्माण साठी एकूण १३५ कोटि निधिचे कार्यक्रम ही तैयार करण्यात आले आहे. या रोडाच्या बांधकामाच्या मागनीला धरून मागील २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार कोरोटे यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी सतत पाठपुरावा केला. परंतु मागील दोन वर्षापासून उदभवलेल्या कोरोना संसर्गामुळे देश व राज्य शासनाच्या आर्थिक व तांत्रिक अड़ीअड़चनी मुळे सदर रोडाचे बांधकाम निधी अभावी थांबले त्यामुळे या रोडाचे काम होऊ शकले नाही.परंतू या भागातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपुरचे अधीक्षक अभियंता सर देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनिवरुण गंभीर चर्चा केली आणि अखेर या रोडाच्या दुरुस्ती करीता २ कोटि ४० लक्ष रूपये निधी मंजूर करूण घेतली.आता लवकरच चा या रोडाच्या दुरूस्तीचे काम सुरु होणार असल्याची माहिती आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.
आमदार कोरोटे यांच्या पुढाकार व प्रयत्नाला या कामात यश मिळाले असून या क्षेत्रातील लोकांनी आमदार कोरोटे यांचे आभार मानून त्यांचे अभिनंदन केले आहे

Print Friendly, PDF & Email
Share