‘एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत’ पोलिस विभागाचे अप्रतिम उपक्रम

डॉ. सुजीत टेटे

गोंदिया, 11- एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत या अप्रतिम उपक्रमाची सुरुवात गोंदिया जिल्हात पोलिस अधीक्षक विश्व पानसरे , अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असून भारतीय संस्कृती मध्ये दिवाळी सणाला अतिशय महत्वाचे स्थान दिलेले आहे. गरीब असो व श्रीमंत आपल्या मिळकटीतून दिवाळीचा सान साजरा करण्यास उत्सुक असतो आणि आदिवासी बांधव आपल्या अल्प उत्पन्नातून अत्यंत साध्यरीतीने सण साजरा करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्हातील नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवासोबत गोंदिया पोलिस एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत या उपक्रमातून आपले योगदान देत असल्याचे दिसून येते.

दि. 10/11/2020 रोजी सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा अंतर्गत भर्रीटोला या आदिवासी गावात उपविभागीय पोलिस अधिकारी जालीदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात , सशस्त्र दूरक्षेत्र चे अधिकारी आणि आयआरबी गट 15 चे सर्व प्लाटुन्न सर्वांनी आर्थिक निधि गोळा करून अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दिवाळी भेट वस्तु म्हणून चादर , ब्लांकेट, साडी , मुलांना टीशर्ट व पॅंट इत्यादि वास्तु व फराळ वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम पोलिस स्टेशन सालेकसाचे ठानेदार प्रमोद बघेले , प्रभारी अधिकारी मधुकर सावलराम, पोनि. सतीश नवले , पोउनि सुदर्शन इंगोळे प्रतिष्ठित नागरिक , सरपंच देवकीबाई उइके तसेच गावकरी प्रमुक्याने उपस्थित होते. सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा चे अधिकारी व अमलदार यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी महत्वाचे योगदान दिले.

Print Friendly, PDF & Email
Share