जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी-नागभिड येथील संजय येरणे व जिल्हा सचिव पदी शेष देऊरमल्ले यांची निवड.

सुदर्शन एम. लांडेकर

उपसंपादक प्रहारTimes

मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद ही जिल्ह्यातील, राज्यातील अग्रगण्य साहित्य संस्था असून या द्वारा सामाजिक व साहित्यिक कार्य पार पाडले जात आहे. तळागाळापर्यंत वैचारिक मंथन केले जाणारे हे साहित्य संघटन असून जिल्हाध्यक्ष पदी संजय येरणे साहित्यिक नागभिड यांची निवड करण्यात आलेली आहे.

संजय येरणे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे 23 ग्रंथ प्रकाशित असून इतिहास संशोधन,संत साहित्य याचे गाडे अभ्यासक आहेत. बालकांच्या शैक्षनिक बाबीला लक्षात घेत त्यांनी स्वतःचे इंग्रजी रीडिंग पॅटर्न प्रकाशित करून अध्यापन पद्धतीला नवं स्वरूप देण्याचे कार्य ही केले आहे. तसेच संताजी व त्यांची पत्नी यमुना या विषयावर जगातील पहिली कादंबरी लेखन करून योद्धा, यमुना ह्या कादंबरी द्वारा महाराष्ट्रभर वाचक निर्माण केले. लवकरच त्यांचं कथा संग्रह प्रकाशित होत आहे.
तसेच जिल्हा सचिव शेष देऊरमल्ले यांची निवड झाली असून त्यांचे दोन बालकविता संग्रह तसेच लाल दिव्यातील नग्न सत्य हा वैचारिक शोधकविता संग्रह व कथासंग्रह प्रकाशित असून ते उत्तम काष्ट शिल्पकार म्हणून राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रसिद्ध आहेत.
राज्यअध्यक्ष निर्मला पाटील सांगली, विभाग अध्यक्ष पुष्पा बोंडे यांनी पत्राद्वारे नियुक्ती केली आहे. साहित्य परिषद द्वारा वेगवेगळे साहित्य उपक्रम राबविण्याचा निर्धार असून यांच्या निवडीने सर्व साहित्य, व शिक्षण स्तरातून तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी बा.व परीसर ,क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन तथा विविध संस्था चे पदाधिकारी तसेच सर्व मिञपरीवार कडून अभिनंदन केले जात आहे. तसेच सर्व तालुकास्तरावर कार्यकारिणी परिषद निवड सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share