शहरातील स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोकांनी सहभाग घ्यावा- मुख्याधिकारी अजय पाटणकर

नगरपंचायतचे राष्ट्रीय पातळीवर उच्च स्थान प्राप्त करण्याचे ध्येय धोरण

डॉ. सुजित टेटे/ प्रहारटाईम्स
देवरी, ता.१०; मागील वर्षीप्रमानेच यावर्षी सुद्धा आपले देवरी शहर “स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेत आहे. मागच्या वर्षी “स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये आपल्या देवरी शहराचे राज्य स्तरीय (महाराष्ट्र)सर्वेक्षणात 80 वा स्थान आणि विभागीय (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात व राजस्थान) स्तरावर 118 वे स्थान प्राप्त झाले होते. परन्तु यावेळी आपल्या देवरी शहराला राष्ट्रीय पातळीवर उच्चस्थान मिळविन्याचे आपले ध्येय व धोरण असल्याने शहरातील सर्व लोकांनी या “स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या अभियानात सहभाग घेवून उच्चस्तरीय समर्थन आणि सहकार्य तसेच सहभाग घेण्याचे आवाहन देवरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी प्रसिद्धि पत्रकातुन केले आहे.
या स्वच्छ सर्वेक्षनामध्ये विशेष आवड दर्शविनारे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकानुसार देवरीच्या सर्व 17 प्रभागातील १०० गुण स्वछतेसाठी मिळावेत. या करिता सर्व प्रभागातील नगरसेवक प्रयत्न करित आहेत. यात शहरातील प्रत्येक घरातील लोकांचे आणि नगरसेवकांचे उच्चस्तरीय समर्थन आणि सहकार्य व सहभाग मिळत आहे. या करिता नोडल अधिकारी सचिन मेश्राम आणि त्यांच्या स्वच्छता चमुने शहरातील व्यवसाय क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र स्वच्छ ठेवले आहे. यावेळी देवरी शहर आणखी सुंदर व क्रिएटिव्ह करण्यासाठी लोकांना स्वच्छतेसाठी अधिक जागृत करने गरजेचे आहे. तसेच देवरी शहरातील स्वच्छता अँप मध्ये स्वच्छता समाधान तंत्रव्यवस्था आहे. यात कोणताही वापरकर्ता प्ले स्टोर वरुण सदर अँप डाउनलोड करू शकतो आणि कोणतेही समस्या उदाहरणार्थ जवळपास क्षेत्रात जनावर मरण पावले असेल किंवा रस्त्यावर झाड़ू लागले नसेल, कचरागाडी येत नसेल. सार्वजनिक शौचालय सफाई होत नसेल किंवा योग्य प्रकारची व्यवस्था होत नसेल या प्रकारच्या सर्व तक्रारी नोंदवू शकतो.
त्याचप्रमाणे स्वच्छता निरीक्षक संजय कान्हेकर व त्यांची स्वच्छता सफाई चमुने शहरात मागील वर्षापासून सुका व ओला कचरा स्वतंत्रपने गोड़ा करण्याचे काम करीत आहेत. यात सुका कचरेत, कापड, कागद व प्लास्टिक आदि. आणि ओला कचरेत भाजीपाला, अन्न, हिरवीपाने व खाद्यपदार्थ तसेच घरातील घातक कच-यांमध्ये बाळाचे डायपर, बल्ब व पेंटचे डब्बे आदि अशा सर्व कचरा वेगवेगळा गोळाकरीत आहेत. तसेच देवरी शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाची पातळी ही आणखी सुधारली जाईल. जेणेकरून लोकांना अधिक चांगले अनुभव मिड़ेल. या व्यतिरिक्त या कामात लोकसहभागाची गरज देखील आवश्यक आहे. कारण मागील वर्षी देवरी शहरातील काही दुर्गम व्यक्तिन्नी सार्वजनिक शौचालयातील बल्ब, आरसे, नळ व शौचालयाचे दरवाजे चोरल्याची घटना सुद्धा घडली आहे. या सर्व गोष्टीनां नियंत्रित करण्यासाठी आणि यावर्षिच्या सर्वेक्षनात स्वच्छतागृहा मधील 100 पैकी 100 गुण मिळावेत या करिता स्थानिक लोकांचा सहभाग मिळने खुप गरजेचे आहे.
आता देवरी शहराची सर्व सार्वजनिक शौचालय ह्या गुगलवर अपलोड केली गेली आहेत. गुगलवर (Toilet Near Me ) किंवा (S.B.M. Toilet) लिहून सर्च करता येईल त्यामुड़े बाहेरुन येणाऱ्या प्रवाशान्ना शौचालय शोधने सोपे जाईल आणि देवरी शहरात उघड़यावर शौच करने किंवा लघवी करने पासून मुक्त ठेवता येईल.
तरी शहरातील सर्व लोकांनी या “स्वच्छ सर्वेक्षण” अभियानात सहभाग घेवून उच्चस्तरीय समर्थन सहकार्य व सहभाग घेण्याचे आवाहन देवरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केले आहे.
Print Friendly, PDF & Email
Share