राष्ट्रीय एकात्मता पत्रकारिता पुरस्काराने राकेश रोकडे सन्मानित

योगेश कावले/तालुका प्रतिनिधी

सालेकसा ८:
राज्यस्तरावर दीनदुबळे, गोरगरीब, अनाथ, निराश्रित जनांसाठी सातत्याने कार्य करीत असलेल्या दिव्या फाऊंडेशन च्या वतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या दिग्गजांना कार्याचा गौरव करणारा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतो. यावर्षी बुलढाणा येथील रेसीडेन्सी क्लब या ठिकाणी भव्यदिव्य राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार सोहळा पार पडला असून विविध कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना पुरस्कृत करण्यात आले.
तालुक्यातील दैनिक जग प्रेरणा व पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी व युवा पत्रकार श्री राकेश रोकडे यांना यावेळी राष्ट्रीय एकात्मता उत्कृष्ट पत्रकारिता 2020 या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले पुरस्कार सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष आशिषदादा खडसे, दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष अशोकदादा काकडे, सुकेश जी झंवर, रमेशजी घेवंदे, विजयराज शिंदे, किरण डोंगरदिवे, लक्ष्मीकांत बगाडे, डॉ. वैशाली निकम यांच्या प्रमुख हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने रोकडे यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल दिव्या फाऊंडेशनचे गोंदिया जिल्हा समन्वयक चंद्रकुमार बहेकार, सचिन फुंडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष पवन पाथोडे, योगेश कावळे, दुर्गेश डिब्बे, संध्या फुंडे, सारिका रोकडे, प्रेरणा बहेकार,धारणा कावळे,प्रा.सुजित टेटे तसेच सालेकसा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share