सावली येथिल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदिप तिडके यांचे निलंबन

प्रहार टाईम्स /भुपेंद्र मस्के
गोंदिया 7: पंचायत समिती देवरी येथिल जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीचे प्रभारी मुख्याध्यापक संदिप ईश्वरदास तिडके यांना जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे (भा.प्र.से) यांनी निलंबित केल्याची घटना आहे.

सविस्तर असे कि, संदिप तिडके हे वरिष्ठांची परवानगी न घेता जिल्ह्याबाहेर जाणे. रजा मंजूर न करता रजेवर असणे, दि.३ नोव्हेंबर २०२० ला गटशिक्षणाधिकारी देवरी यांची विनापरवानगीने जिल्हा परिषद गोंदिया येथिल कार्यालयात येणे, वरिष्ट अधिकाऱ्यांशी अरेरावीपणाने वागणे. पुर्णवेळ शिक्षक पदावर असुन मान्यता प्राप्त नसलेल्या संघटनेमध्ये सहभागी होऊन शासनविरोधी कार्यात पुढाकार घेऊन त्यांनी आपल्या नियत कर्तव्यात अक्षम्य चुक केलेली आहे हे सबब पुढे करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम ३ मधिल तरतुदी नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजल्याचे जिल्ह्यात चित्र आहे

Print Friendly, PDF & Email
Share