शिवसेना हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष – निलेश धुमाळ

प्रहार टाईम्स
देवरी 20–
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त गोंदिया जिल्हा शिवसेना महिला आघाडीने ५५ कोरोंना योद्ध्यांचा सत्कार करून शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा केला.
गोंदिया जिल्हा शिवसेना महिला आघाडीने कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची व रुग्णांची सेवा करणार्‍या ५५ कोरोना यीद्ध्यांना भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटक सौ. शीतलताई मंढारी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र नायडू यांचे हस्ते स्मृति चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा केला. अतिथींच्या स्वागतार्थ आणि शिवसेनेच्या सन्मानार्थ ‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले उद्धवसाहेबांनी’ या गीतावर सादर केलेले नृत्य बघून सर्वं उपस्थित पाहुणे व शिवसैनिक भारावून गेले.


सत्कार करण्यात आलेल्या कोरोना योध्यात नर्स, नगर पंचायत देवरीचे महिला सफाई कामगार आणि आशा सेविका यांचा मोठया संख्येने समावेश होता. सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, प्रमुख मार्गदर्शक भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटक सौ. शीतलताई मंढारी, विशेष अतिथि शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र नायडू, तिरोडा विधानसभा संपर्क प्रमुख प्राविण शिंदे, अर्जुनी मोरगाव विधानसभा संपर्क प्रमुख बाळा परब, सौ. शिल्पाताई मोरे आणि प्रमुख अतिथि गोंदिया जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ. करुणा कुर्वे, देवरी तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख सुनिल मिश्रा, देवरी शहर प्रमुख राजा भाटीया, पंचायत समितीचे माजी उपसभापती देवरी विधानसभा संघटक राजीक खान यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.


याप्रसंगी संपावर असलेल्या आशा सेविकांच्या शिष्टमंडळाने शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ आणि संपर्क संघटक सौ. शीतलताई मंढारी यांच्याशी संवाद साधून निवेदन दिले. आशा सेविका सुषमा कोसरकर यांनी आपल्या मनोगतातून आशा सेविकांचे प्रश्न मांडले. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारातून घडलेली असून महिलांचा सन्मान करणारा हा पक्ष आहे असे विचार भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असल्यामुळे सर्वांनाच न्याय मिळेल आणि महिलांच्या सशस्तिकरणावर अधिक भर दिला जाईल अशी भावना आपल्या मार्गदर्शनातून जिल्ह्याच्या शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटक सौ. शीतलताई मंढारी यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रमुख सुरेन्द्र नायडू, प्राविण शिंदे, बाळा परब आणि राजीक खान यांनीही यावेळी आपले विचार केले. सत्कार सोहळ्याचे आयोजन गोंदिया जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ. करुणा कुर्वे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख सुनील मिश्रा आणि कार्यक्रमाचे संचालन शिक्षक सेनेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष अनिल कुर्वे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवरी तालुका संघटक प्रीती उईके, युवती सेना शहर प्रमुख प्रीती नेवरगडे, ज्वाला पांडे, शिवसेना तालुका उपप्रमुख दालचंद मडावी, तालुका उपसंघटक प्रीती भांडारकर, तेजेश्वरी आचले, सलमा पठाण, सुहाग गीरी, राजा मिश्रा, परवेज पठाण, कमलेश पांडे, राजू येरणे, क्रिष्ना राखडे, गणेशसिह चंदेल यांनी अथक परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share