हेल्पिंग बॉईज ग्रुप तर्फे देवरी शहरातील सार्वजनिक बोरवेल दुरुस्ती व सफाईची मागणी

:देवरी 14: शहरामध्ये नगरपंचायत कडून नळ योजना राबविण्यात आली. पण शहरातील असलेल्या सार्वजनिक बोरवेल व विहिरीकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झालेले आहे. कित्येक घरे सार्वजनिक बोरवेल व विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहरात असलेल्या काही बोरवेल नादुरुस्त आहेत तर काहींचा पाणी खूपच गडूळ येत आहे . याकरिता नागरिकांच्या वतीने हेल्पिंग ग्रुप तर्फे मुख्याधिकारी नगरपंचायत देवरी यांना निवेदन देण्यात आले

शहरात असलेले सार्वजनिक बोरवेल दुरुस्त करण्यात यावे व साफसफाई करण्यात यावे , तसेच सार्वजनिक विहिरी मध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावे. यावेळी मुख्यता हेल्पिंग बॉईज ग्रुप सदस्य ईलियास कुरेशी, गोलू गुप्ता, कुणाल कतरे, सचिन भांडारकर, पृथ्वीराज नंदेश्वर, सोमन चव्हाण, निखिल अग्रवाल, बाळकृष्ण राऊत उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share