देवरी तालुक्यातील मौजा आंभोरा येथे धान खरेदी केन्द्राचे शुभारंभ -आमदार सहषरामभाऊ कोरोटे यांच्या हस्ते केन्द्राचे उदघाटन

डॉ. सुजित टेटे

देवरी,ता.01: देवरी तालुक्यातील अंभोरा येथील आदिवासी विवीध कार्यकारी सहकारी संस्थेचे आधारभुत भात खरेदी केन्द्राचे उत्घाटन आमगावदेवरी विधानसभेचे आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे यांच्या हस्ते रवीवार (ता.01नोव्हेंबर) रोजी करण्यात आले. नतंर संस्थे च्या वतीने आमदार कोरोटे यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग हे होते.या प्रसंगी तालुका कांग्रेस चे अध्यक्ष संदिप भाटिया,संस्थेचे उपाध्यक्ष शिवकुमार राउत, व संस्थेचे संचालक प्रल्हाद दुधनांग,बळीरामजी कोटवार,सुकलाल राउत,गौरसिंग करईबाग,बिसन मडावी,कृष्णा घरत,काशीराम कापसे,संचालीका धृपताताई कुंभरे, निताताई घरत,केन्द्र प्रमुख लखनलाल दुधकावरा, भीमराव गावळ यांच्यासह परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार कोरोटे यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्तावीक व संचालन संस्थेचे सचिव मधुकरजी शहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार केन्द्रप्रमुख भीमरावजी गावळ यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share