LOGO

देवरी-चिचगड राज्यमहामार्गावर अंभोरा येथे अपघात एकाचा मृत्यू

देवरी ३१: देवरी-चिचगड राज्यमहामार्गावर अंभोरा येथे अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजे दरम्यान घडली. मोटारसायकला ट्रक जोरदार धडक दिली त्यात मोटारसायकल चालकाचा पायावरून ट्रक गेल्यानं नारायण बोंडकू बडोले अंभोरा हे गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांना चिचगड येथे ग्रामिण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष म्हणजे ट्रक धडक मारून पसार झाला होता पण अपघाताची ची माहिती मिळताच चिचगड चे ठाणेदार अतुल तवाडे यांनी व त्यांच्याच चमूने पाठलाग करून ट्रक क्र CG08, AA,5851 ला बोंडे-घोनाडी जवळ पकडून पोलिस स्टेशनला आणले. पुढील तपास पो.ह सुधाकर शहारे, विष्णु राठोड , रवी जाधव हे पोलिस कर्मचारी आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share