♦️करुणा कुर्वे यांनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी zoom meet वर संवाद

♦️गोंदिया जिल्हा संघटिक करुणा कुर्वे शिवसेना महिला आघाडी यांनी आज 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी zoom meet द्वारे मांडल्या समस्या…

देवरी 23: गोंदिया जिल्हा शिवसेना जिल्हा संघटिक करुणा कुर्वे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा.अनिल देसाई यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. या मीटिंग मध्ये राज्यातील सर्व जिल्हातील शिवसेना जिल्हा संघटक उपस्थित होते.

राज्यातील कोरोना स्थिती, जिल्हातील सध्याची परिस्थिती , प्रशासनाची भूमिका , आरोग्य विषयक सोयी सुविधा , प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी यांचे योगदान आणि लॉकडाऊन काळात निर्माण झालेल्या समस्या आदी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोनाला हरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन करून जिल्हातील समस्याची लिखित माहिती संदेश टाईप करून पाठविण्याचे सूचना केल्या.

यावेळी करुणा कुर्वे यांनी आपल्या समस्या मांडतांना जिल्हातील आणि देवरी तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी विशिष्ट लोकांच्या हातातील बाहुले बनून काम करत असल्याची तक्रार केली असल्याची माहिती दिली .

देवरी तालुक्यातिल कामचुकार आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे ढिसाळ आरोग्याच्या सोयी आणि यंत्रणा असल्याची माहिती मुख्यमंत्रांना दिली असून देवरी तालुक्यातील शासकीय रुग्णालयातील तसेच आरोग्य केंद्रातील ४ रुग्णवाहिका एक्स्पायर झालेल्या आहेत त्यापैकी एका रुग्णवाहिकेचा नुकताच अपघात झाला तरीपण त्या चालवत असून रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

देवरी तालुक्यातच नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात रोजगाराची फार मोठी समस्या निर्माण झाल्याची माहिती दिली या मीटिंग मध्ये देण्यात आली असल्याची माहिती करुणा कुर्वे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगतले.

जीवाची पर्वा न करता माझ्या शिवसैनिकांनी कोरोणा काळात रुग्णांची सेवा केल्याचा अभिमान शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला असून आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे तरी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे असे मत यावेळी व्यक्त केले. आपल्या शासनाने कोरोणा काळात जे जे उत्तम करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न केला आणि जनतेनेही संयम बाळगून शासनाला सहकार्य केल्याबद्दल जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Print Friendly, PDF & Email
Share