धक्कादायक! शेतकऱ्याने स्वतःच्या पिकाला लावली आग

कैलास फाये/ प्रतिनिधी
मोरगाव ३०: मौदा तालुक्यातील मोरगाव या गावी धक्कादायक घटना घडलेली बघावयास मिळाली.
स्वतः शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकाला चक्क आग लावली असून सोमा हरी निंबुळकर असे त्याचे नाव आहे.
या शेतकऱ्यांने आपल्या शेतात 1 हेकट्टर इतक्या जागेत भात लागवड केली असता त्यांच्या पिकाला काही कालावधी पासून खोड किड्यांनी धुमाकुड घातली होती आणि त्यांचे शेत हे वाळल्या प्रमाने झाले होते.
त्यांनी विविध प्रकारची औषध देखील फवारणी केली पण भात लागवडीवर नियंत्रण करू शकले नाही. अखेर ते वैतागले व गेलेले पीक नियंत्रण करता येणार नाही पण जर पुन्हा आपण शेत पिकासाठी तयार केलं तर नवीन सुरवात करता येईल असं त्यांना वाटले त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पिकाला आग लावली.
सदर शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकशान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share