देवरी येथे महामार्गावर भिषण अपघात

भरधाव ट्रेलरची विरुद्ध दिशेला उभ्या ट्रकला जोरदार धडक

उभ्या ट्रक मुळे अपघातात वाढ

देवरी २९:
देवरी शहराच्या मधोमध राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वर लोखंडी रुळ वाहून नेणाऱ्या ट्रेलर क्र NL 01 K 5871 ने विरुद्ध दिशेला उभ्या ट्रक क्र CG 08 2110
ला जोरदार धडक दिली असून या अपघातात ट्रेलर चालक आणि वाहक दोघेही घटनास्थळी मृत झाल्याचे प्रत्येक्षदर्शीच्या चर्चा रंगल्या आहेत.
देवरी येथे महामार्गावर दुतर्फा मोठे ट्रक आणि इतर वाहनांच्या रांगा लागून असल्यामुळे अपघातात वाढ होत असल्याचे बघावयास मिळत आहे.
ट्रक चालक आपले वाहन उभे करून देवरी येथील बाजारात तसेच चहापाणी आणि जेवणासाठी जातात त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असल्याचे चित्र बघावयास मिळते आणि अपघातांना आमंत्रण दिले जाते. वृत्त लिहत पर्यंत मृत चालक आणि वाहकाचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share