उद्या 45 वर्षावरील लाभार्थ्यांसाठी covaxine दुसरा डोजाचे लसीकरण होणार – तहसीलदार विजय बोरुडे

प्रहार टाईम्स / देवरी 14: तालुक्यातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांसाठी covaxin लसीच्या दुसरा डोज उपलब्ध झाला असून फक्त दुसरा डोज असलेल्या लाभार्थ्यांना तो देण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.

सदर लसीकरण दि. १५.०५.२१ रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत फक्त covaxin लस तालुक्यातील खालील ठिकाणी उपलब्ध असणार असल्याची माहिती प्रशासनाने असून स्पॉट वरच नोंदणी व लसीकरण होणार आहे. ही लस फक्त आणि फक्त ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसरा डोस असणार आहे.

PHC मुल्ला.. 80 डोस

PHC फुटाना.. 80 डोस

PHC घोणाडी..40 डोस

PHC ककोडी…30 डोस

ग्रामीण रुग्णालय
चीचगड……….30 डोस

ग्रामीण रुग्णालय
देवरी ………………..40 डोस

ज्यांनी १ ला covaxin चा डोस लावला आहे
व दुसऱ्या डोस साठी ज्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे
अशा ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन दुसरा डोस घेण्यासाठी शनिवारी वरील ठिकाणी हजर राहावे असे देवरी तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी जनतेला आवाहन केले आहे.

तरी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे व लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे. लसीकरणाची संभावित माहिती वेळोवेळो आपल्या पर्यंत पोहचवली जाणार असून आपल्या सभोवतालच्या लोकांना लसीकरण करून घेण्यास जनहितार्थ माहिती द्यावी.

Print Friendly, PDF & Email
Share