जेएमसी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावरील वाहन व वाहनचालक धोक्यात

तुषार हर्षे / प्रहार टाईम्स

लाखनी 28 – जेएमसी कंपनीद्वारे लाखनी येथे उड्डाणपुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून हजारो वाहने या उड्डाण पूलाखालून येजा करत असतात. उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर सुरू असतांना कुठलीही सुरक्षा व्यवस्था न करता भन्नाटपणे काम सुरू असल्यामुळे खालून जाणार्‍या वाहनावर लोखंडी वस्तु तसेच उड्डाण पूलाच्या कामातील तत्सम वस्तु पडल्यामुळे वाहन चालकांचे संतुलन बिघडत असून वाहणाचे मोठे नुकसान होत असल्याचे बघावयास मिळत आहे. खबरदारीचे सुरक्षाविषयक उपाय योजनेच्या अभावी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जे एम सी कंपनीच्या कार्यपध्ध्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मनुष्यबळ कमी असल्यामुळे सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात अडथळे येत आहेत असे मत जे एम सी कंपनीच्या पर्यवेक्षकानी प्रहार टाईम्स च्या प्रतींनिधीशी बोलतांना सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share