धक्कादायक ! अपघातात चालक वाहनासोबत जळाला , 4 बचावले

कोहमारा 13: नातलगाची प्रकृती बरी नसल्याची बातमी कळताच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून घरी परत येत असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला,वळणार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला चार चाकी (ओमनी) जाऊन आदळली,त्यामुळे गाडीने पेट घेतला यात दोन इसमासह दोन लहान बालके वाचली तर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ७.३० दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथे घडली .

मृत्यू झालेल्या चालकाचे नाव मुन्ना वकटु कांबळे (३५) रा.सिंदीपार असे असून सुभाष शिवा कांबळे,व रामकृष्ण शिवा कांबळे दोन लहान बालकांचा सुदैवाने जीव वाचला

नातलगाची प्रकृती बिघडल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी जाऊन परत येत असताना वळणार हा अपघात घडला गाडी झाडावर आढळली आणि गाडीने पेट घेतला दोन बालकासह इतर दोघांनी गाडीतून कसेबसे आपले प्राण वाचवले मात्र चालकाचा गाडीतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेचा तपास डुगीपार पोलीस करत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share