106 रूग्ण औषधोपचारातून बरेनव्याने आढळले 97 पॉझिटिव्ह रुग्ण

गोंदिया 28: (जिमाका) जिल्ह्यात प्रयोगशाळेतून आज प्राप्त अहवालात नव्याने 97 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. 106 बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली.
नव्याने आज जिल्ह्यात 97 कोरोना बाधित रुग्ण आढळले. ती रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-43, तिरोडा तालुका -02, गोरेगाव तालुका-04,आमगाव तालुका-10, सालेकसा तालुका-09, देवरी तालुका-09, सडक/अर्जुनी तालुका-11, अर्जुनी/मोरगाव तालुका-08 आणि बाहेर जिल्हा/ बाहेर राज्यातील एक रुग्ण आढळून आला.

Print Friendly, PDF & Email
Share