गरजू कुटुंबाला नयी रोशनी बहुउद्देशीय संस्थे चा मदतीचा हात

देवरी: येथील प्रभाग क्रमांक 13 येथील स्थानिक रहिवासी अशोकजी वर्मा यांच्या पत्नीचे मागील वर्षी कोरोना काळात अपघाती मृत्यू झाल्यामुळे सदर कुटुंबास अत्यंत हालाखिच्या परिस्थिती चा सामना करावा लागत आहे त्यात ही पत्नी चा मृत्यू झाल्या मुळे त्यांच्यामागे एकूण आठ अपत्य असा हा मोठा परिवार ,याची संपूर्ण जवाबदारी एकट्या वडिलावर पडली आहे त्यात ही टाळेबंदीत व्यवसाय ठप्प झालेला रोजगाराचा अभाव असल्याने निराशाच्या गरतेत सापडलेल्या कुटुंबास नयी रोशनी बहुउद्देशीय संस्थेच्या युवकांच्या लक्षात आली त्यांनी त्वरित ही परिस्थिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांना कळविले असता त्यांच्या आणि नयी रोशनी बहुउद्देशिय संस्था देवरी यांच्या तर्फे अशोकजी वर्मा यांना तात्काळ मदत करण्यात आली खालील कार्यात पोलीस अमलदार शेखर गणवीर व संस्थेचे पदाधिकारी मोहित रामटेके ,निखिल गेडाम ,अजय मरस्कोल्हे ,हिमांशू शर्मा , प्रेषित चचाने आदी नयी रोशनी बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य उपस्थित होते

Print Friendly, PDF & Email
Share